ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले; परंतु स्वत:च्या भावना आवरून ती म्हणाली, 'देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुध्दी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग.'
मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो.
वडिलांचा राग मावळला होता. 'ये इकडे,'असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, 'जा आता, शाळा आहे ना?'
मी म्हटले, 'आज रविवार, आज सुट्टी आहे.'
वडील म्हणाले, 'मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू.' मी होय म्हटले.
वडिलांचा स्वभाव मोठा हुषार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम
खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळयांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळया चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना? कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे; परंतु नीट फुललेले वहा.'
'गडयांनो