होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी; तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढब व ऐदी गोळयाला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे :-

करूनि माता अनुराग राग ।

विकासवीबाळ-मना-विभाग

फुले तरू सेवुनि उष्ण शीत ।

जगी असे हीच विकास-रीत ॥


रात्र नववी: मोरी गाय


"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसर्यालची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला.


"तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो


102 of 468

! अशा खुडून आणलेल्या मुक्या कळयांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात. रसमय, गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळया नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा


102 of 773