आहे.' शिवा म्हणाला.
श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, 'बारकू! तू मला आवडतोस, म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोर्याा गाईची गोष्ट सांगणार आहे.'
श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहात होती. श्यामने सुरूवात केली:
"आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळयासमोर आहे. अशी गाय आपल्या सार्याच गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे.'
माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठयात जावयाची. मोर्याट
न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, 'श्याम ! मुक्या कळया नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फुलू दे.''
रात्र चवथी: पुण्यात्मा यशवंत
"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली.
"जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता.' शिवा म्हणाला.
"तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्याजवळ बैस.' असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले.
श्याम सांगू लागला:
"ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस