गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंडदेखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुसर्याहची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसर्यापच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसर्याभची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.
माझी आई मधून गोठयात जावयाची.
तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो.
आम्ही शाळेत गेलो; परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता; परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे