तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोर्याे गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी, तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोर्याआ गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसर्याआ कोणाला काढू देत नसे.

ज्याने द्यावे त्याने घ्यावे, असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. 'गंधेन गाव: पश्यन्ति.' गाई वासाने


105 of 468

त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना व लघ्वीसही होईना. खेडयात कोठला डॉक्टर, कोठला एनिमा! घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलाविण्यासाठी आला. अण्णा, दादा, अशी यशवंता आमची आठवण करीत होता.

आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी! गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाआप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते.


105 of 773