ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणार्यासला ती लाथ मारी. 'पाप्या! माझ्या कासेला तू हात लावू नकोस; माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, 'असे जणू ती सांगत असे.

ती मोरी गाय भाग्यवान होती, असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात. एक दोन दिवसांत ढोर मरते.

मोर्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले; परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती.


106 of 468

पाण्याच्या भांडयाकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत.

त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करुन ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, 'डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते? बराच की रे आहेस!'

'नाही ग आजी,


106 of 773