आम्ही घरात जपही केले; परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु:ख कळते! इतरांस काय समज? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात असे.

कधी कधी बोलताना आई म्हणे, 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली. ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दु:ख, रोग, दारिद्रय, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या


107 of 468

मी नव्हतो खात; उगीच आपला माझ्यावर आळ!' रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला.

घरात आई सांधे दुखण्याने त्या वेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. 'डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून?'

'आई ! मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारीजणं मला बोलता?' असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला.

आदल्या दिवशीचा तो प्रकार; परंतु आता


107 of 773