आई म्हणाली.
'शेजारची भिमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ?' वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती.
'चल, तेथे मग 'मला झोप येते, चल घरी' अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र!' असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले.
आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत.
वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती.
'शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे. ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही-दूध
दुखतात.' यशवंत खोल आवाजात म्हणाला.
आईचे हृदय गहिवरले. 'नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो, मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते, माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील.' आई म्हणाली.
आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातांत घेऊन यशवंत म्हणाला, 'आई! तू आपली माझ्याजवळ बस, म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले.'
यशवंताचा एकेक शब्द आईच्या व