दिले, परंतु स्वत: चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावाबहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले! घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळयांत पाणी आणून कधी कधी सांगत असे

तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपति-उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळयांतून अश्रू


110 of 468

आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे. भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणार्याो मुखकमलावर अश्रुसिंचन केले. 'ते पहा', प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले.

त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत 'राम राम' म्हणत आम्हांस सोडून गेला!

आई नेहमी म्हणायची, 'यशवंत पुण्यात्मा होता, म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला,' लहानपणी आम्ही आकाशाकडे


110 of 773