आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई. कारण स्वत:ची परिस्थिती ती ओळखून होती.
आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नवर्याडसह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते. आई ओटीवर गेली व म्हणाली 'माझ्याच्याने येथे अत:पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते.'
वडील म्हणाले, 'अगं, आपण आपलेच भात खातो ना? फक्त येथे राहातो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत?'
आई एकदम संतापून म्हणाली, 'तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी.'
माझे वडील शांतपणे
मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. 'बहुता सुकृतांची जोडी' पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर मातापितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते; परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.'
रात्र पाचवी: मथुरी
श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.'
"अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण