भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठया कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातीतील पाटल्या घ्या, या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळयात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला?' असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या.

वडील स्तंभितच झाले. 'तुला इतके दु:ख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लौकरच लहानसे घर बांधतो.' असे वडिलांनी आश्वासन दिले.

माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे, स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय.

आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा


114 of 468

घरी असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणार्याथ बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोनतीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता, तो लहान होता. दहाबारा वर्षांचा असेल.

'मथुरी उन्हाळयाच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू, वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच


114 of 773