हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.'

त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, 'श्याम! नवे घर तुला आवडले का?'

मी म्हटले, 'हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल.'

माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले? जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर! नाही, आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, 'होय, मथुरी


116 of 468

कामावर जाता न आले तर दुसर्याप कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे, ही कर्तव्यबुध्दी त्या गरीब मोलकरणीतही होती.

'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले.

इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.'

'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली.

दुपारी बाराएक


116 of 773