घरात प्रेम आहे, तू आहेस.' मी म्हटले.
माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, 'श्याम! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस? खरेच आपले हे साधे, सुंदर घर तार्यां नाही आवडेल, सार्यांसना आवडेल!'
रात्र अकरावी: भूतदया
"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.
आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला; परंतु भिका कसचा ऐकतो! 'इथे दिवा असला, म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हांला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळयांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते, तर नाटक अंधारातही करता
असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला.
तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या,