सुंदर फुले येतील, मोगर्याबची फुले अधिकच तजेलदार दिसतील. कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलांत तुमच्यासाठी ते येईल व तुम्हांला गोड वास देईल.'
मी म्हटले, 'त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं, होय ना? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले, त्यावर डाळिंबाचे झाड लाविले; परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल, हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील? फारच वास येईल, नाही का ग आई?'
आई म्हणाली, 'जा लौकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये.'
'त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना.' मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती, तेथे गेलो. शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळयांतून पाणी
कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सार्यां वर तिचा लोभ.'
अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.
रात्र सहावी: थोर अश्रू
लहानपणापासून दोन्ही वेळा