भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे. उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवील. नाहीतर भावोजींबरोबर जा. अरे उठल्याबसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्यामुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व अंबी, त्यासुध्दा शिकल्या पोहायला. तू बांगडया तरी भर! पण बांगडया भरणार्याे मुलींहून सुध्दा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या. त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो.'

मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे मी नक्की ओळखले होते. मी माळयावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण आठ वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले.

'श्यामची आई! श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पाहा सुखडी आणल्या आहेत.' बन्या म्हणाला.


129 of 468

तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?

मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.'

गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून


129 of 773