'हो, येणार आहे; परंतु आहे कोठे तो? मला वाटले, की तुमच्याकडेच आहे. श्याम! अरे श्याम! कोठे बाहेर गेला की काय?' असे, म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो.
मुले म्हणाली, 'तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला. कोठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का, श्यामची आई?
आई म्हणाली, 'बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर-घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता; पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगत पाय ठेवून जा.'
मुले माळयावर येऊ लागली. आता मी सापडणार, असे वाटू लागले, मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले, की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळयातून पाणी पिऊन आले, तसे
बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सार्यांवचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु