मला जर लहान होता आले असते तर! भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो.
'नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीत?' एक जण म्हणाला.
'चला आपण जाऊ; उशीर होईल मागून.' दुसरा म्हणाला.
इतक्यात भास्कर म्हणाला, 'अरे, तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे. श्यामच तो!' सारे पाहू लागले.
'श्याम! चल ना रे, असा काय लपून बसतोस?' सारे म्हणाले.
'आहे ना वर? मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला. नेल्याशिवाय राहू नका!' आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले. ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावीत होतो.
'श्यामची आई! तो काही येत नाही व हलत नाही.' मुले म्हणाली.
आईला राग आला व ती म्हणाली, 'बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा-मीच येत्ये थांबा.' आई वर
मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे.
'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।'
अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!'
रात्र सातवी: पत्रावळ
"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता