आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुसर्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली.

'तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला! बघू कसा येत नाही तो!'

मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. 'नको ग आई मारू! आई, आई मेलो!' मी ओरडू लागलो.

'काही मरत नाहीस! ऊठ, तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवा रे याला. चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे. ऊठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत, भिकारडया, लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला!' असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले.

'जातो मी. नको मारू!' मी म्हटले.

'नीघ तर. पुन्हा पळालास तर बघ. घरात घेणार नाही!' आई म्हणाली.


132 of 468

व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्दा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून, कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान करून संध्या, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास


132 of 773