'श्याम! अरे मी सुध्दा उडी मारते. परवा गोविंदकाकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारिली. मजा आली.' वेणू म्हणाली.

'सोडा रे त्याचा हात. तो येईल हो. श्याम! अरे, भीती नाही. एकदा उडी मारलीस, म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले, तरी तू आपण होऊन उडया मारशील. रडू नकोस.' बन्या म्हणाला.

देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरूण होतेच. 'काय, आज आला का श्याम? ये रे. मी सुखडी नीट बांधतो, हो.' अस म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. 'हं, मार बघू नीट आता उडी.' बाळू म्हणाला.

मी आता डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे. नाक धरी, पुन्हा सोडी. असे चालले होते.

'भित्रा! वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारील.' वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले.


133 of 468

बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण.


मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे: 'पत्रावळी आधी द्रोणा। तो जावई शहाणा ॥' पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे!

घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या, असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची


133 of 773