मी ओरडलो, 'मेलो-आई ग, मेलो.'
पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळयाला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना.
'आडवा हो अस्सा. पोट पाण्याला लाव व लांब हो. हात हलव.' मला पोहण्याचे धडे मिळू लागले.
बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला.
'घाबरू नकोस. घाबरलास म्हणजे लौकर दम लागतो. एकदम कडेला धरावयाला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये.' बाळू वस्तुपाठ देत होता.
'आता फिरून उडी मार. चढ वर.' बन्या म्हणाला.
मी पायर्यार चढून वर आलो, नाक धरिले. पुढे मागे करीत होतो; परंतु शेवटी टाकली एकदाची उडी!
'शाबास, रे श्याम! आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले.' बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरिले व आणखी शिकविले. 'आता आणखी एक उडी मार. म्हणजे आज पुरे.' सारी मुले म्हणाली.
पाने, कुडयाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्याण चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे!
'श्याम! तू पत्रावळ लावावयास शीक. नाही तर आज जेवावयास मिळणार नाही.' असे आईने मला बजावले.
'मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही,'