'मला नको जा, सकाळी मारमार मारिलेस आणि आता दही देतेस.' मी रडवेला होऊन म्हटले, 'हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोचलो, तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?'

आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुऊन आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का, असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, 'श्याम! तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम! तुझ्या आईला 'तुमची मुले भित्री आहेत', असे कोणी म्हटले, तर ते तुला आवडेल का?


136 of 468

विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की, गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची. गप्पागोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पध्दत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले; परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही.

मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. 'ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे',


136 of 773