ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला, तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला, तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये, असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको. चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आज निजू नको, हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो.'

गडयांनो! माझ्या आईला धीट मुले हवी होती. भित्री नको होती.


रात्र तेरावी: स्वाभिमान- रक्षण


"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांगितले आहे. इतर देशांतही उपाध्याय आहेत; इतर धर्मांतही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो; आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई.' श्यामने आरंभ केला.


137 of 468

असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारीजणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. 'उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शीक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो. वाढ आज त्याला,' असे अक्का म्हणू लागली, परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो.

"मी नाहीच लावणार जा. नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर. मी तस्सा उपाशी राहीन.' असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का, याची वाट मी पाहात होतो.

शेवटी


137 of 773