आईने विचारले, 'कोठले रे पैसे?' मी म्हटले. 'शेवंतीवाड्.निश्चयाचे लग्नात मिळाले.' आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब, म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो, म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला, तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, 'वेडया! तू का हात पुढे करावयाचा? तू त्या डोंगर्यांनकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसर्या्ने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दु:खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले ती बोलेना. शून्य दृष्टीने पाहत राहिली.

'आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही हो आणले,' मी काकुळतीस येऊन म्हटले.

आई म्हणाली, 'श्याम! आपण गरीब असलो, तरी गृहस्थ आहोत.


140 of 468

ही दुसरे घे चोय. ही चांगली आहे.' असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठेमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले.

'ही माझी पत्रावळ, वाढ मला.' मी आईला म्हटले.

'हातपाय धुऊन आलास का पण?' आईने विचारले.

'हो; केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही.' मी म्हटले.

'घाणेरडा नाहीस; परंतु सू सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते.' आई म्हणाली.

मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो.

'पोटभर


140 of 773