स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते. परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. 'तुका म्हणे घेतो तोही नरका जातो!' आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा, दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करुन घ्यावे, लाकडे फोडून घ्या, कपडे धुऊन घ्या, जमीन खणून घ्या. काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उध्दार आहे.
उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा, बुध्दीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या
माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की, पाहात बसावे. माझे वडील भाजीच्या दळयांना पाणी शिंपीत. त्या वेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत; परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे. सौंदर्य असले पाहिजे.
माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक