रात्र चौदावी: श्रीखंडाच्या वडया
आमच्या आईला श्रीखंडाच्या वडया फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वडया करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसर्यारच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद.
पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठया बहिणीप्रमाणेच मला वाटे.
त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, 'श्यामची आई! वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वडया देईन म्हणत्ये. तुम्ही याल का उद्या तिसर्याू प्रहरी? तुम्ही कशा छान करता! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले.'
माझी आई
सांगितले.
माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखविला. 'चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत.' असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला.
'आता कोण रागे भरेल?' उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रये, याला एक जर्दाळू दे. शिकल्याबद्दल खाऊ.' आईने सांगितल्याप्रमाणे