कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोडयाची पूड केली.

'श्याम ! कशाला रे आलास?' आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, 'मी काही वडयांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?'

वेणू म्हणाली, 'श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका!'

आई म्हणाली, 'वेण्ये ! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते. पण त्याच्या बर्यागसाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली.

ताटात वडया थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वडया पाडल्या व ती म्हणाली, 'पार्वतीबाई, थोडया वेळाने वडया काढून घ्या, मी आता जाते.'


149 of 468

गेला व म्हणाला, 'श्याम! सारी मंडळी आली; प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पहात आहेत.'

'हो. मी आपला पाहातच राहिलो.' असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरूवात झाली.

मित्रांनो! प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या सार्याी चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत;


149 of 773