वेणू म्हणाली, 'थांबा ना थोडा वेळ. तुमच्या हातारे सारे करुन जा.' आईला नाही म्हणवेना. थोडया वेळाने आईने कलथ्याने वडया काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या ! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, 'श्याम, हे ताट खरवडून खा. घे.' मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वडया ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली.
मी वेणूकडेच बसलो होतो. 'श्याम! तुझे सदर्याबचे बटण तुटले आहे वाटते. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देत्ये.' वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसर्या् ठिकाणी फाटले होते, तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली 'श्याम! चल, गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ.'
परंतु संस्कृतीचे संवर्धन करणार्याप चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे.
आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामनपंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळया श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत. आमच्या