आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. 'श्यामची आई!' वेणूने हाक मारली. परंतु आई कोठे होती? ती विहिरीवर गेली होती, का गोठयात होती? ती अंथरूणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो.

वेणू म्हणाली, 'निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?' वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. 'श्यामची आई ! बराच आला आहे हा ताप!' ती खिन्नपणे म्हणाली.

मी म्हटले, 'वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो.'

वेणूने विचारले, 'मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही बोललासुध्दा नाही. श्यामची आई! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात?'

आई म्हणाली, 'वेणू ! अगं, त्या वेळेस काही फार


151 of 468

अंथरूणावर बसत आणि आम्हाला भूपाळया श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरूणातच गोधडया पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकिट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळया वडील शिकवीत. 'कानी कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नभा' हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय, वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुममंडित जनके, देवी


151 of 773