रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती ! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई.


विठोबाला वाहिली फुले । भजन करिती लहान मुले ।

विठोबाला वाहिली माळ । भजन करिती लहान बाळ ॥


वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळया प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू.

गजेंद्राची ऐकून करूणा । सत्सर पावलासी, जगज्जीवना

प्रल्हादरक्षका मनमोहना । पावे आम्हा सत्वर

द्रौपदीलज्जानिवारणा । पांडवारक्षण मधुसूदना

गोपीजनमानसरंजना । पावे आता सत्वर

अनाथनाथा रूक्मिणीवरा । भीमातीरवासी विहारा

जगद्वंद्या जगदुध्दारा । पावे आता सत्वर

वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते.


156 of 468

वडील जवळ असले म्हणजे मुकाटयाने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे.

त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसर्याोच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे; परंतु कोणी तरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाही तर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले, असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली.

दुपारी स्नान सांगणे


156 of 773