'अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा? मोठयाने ओरडले म्हणजेच देव मिळतो, असे नाही. आपल्यामुळे जर दुसर्यातला त्रास होत असेल, तर ते रे कसले भजन?' आई शांतपणे म्हणाली.

'साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत.' मी म्हटले.

'परंतु मुद्दाम दुसर्या ला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता, तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे?' आईने विचारले.

'वाजविले म्हणजे आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील.' मी म्हणालो.

'हळूहळू टाळया वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हांला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसर्यााला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसर्यातच्या पूजेच्या


161 of 468

हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का?


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।

माथां सेंदुर पाझरे वरि बरे दूर्वांकुरांचे तुरे ॥

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ॥

गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥


मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोडया करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकांस मार बसवावयाचा, हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंडया, बन्या,


161 of 773