आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसर्या्च्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत, तर तुमचे काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार.' असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला.

आम्हां मुलांत वादविवाद सुरू झाला. 'मोठे आले डुढ्ढाचार्य आम्हांला बंद करायला! त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात!' वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे, ते ठरेना. शेवटी मी म्हटले, 'आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळया वाजवू या. मोठयाने वाजविण्यात काय आहे?

'श्याम! तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत.' बापू म्हणाला.

'यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे?' मी विचारले.

माझ्यावरून रूसून


162 of 468

वासू सारे आले व आईला म्हणाले, 'यशोदाकाकू! तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते; परंतु याने म्हटलाच नाही.'

'श्यामनेच मला शिकविलेला 'भरूनि गगन-ताटी शुध्द नक्षत्ररत्ने' तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली.' असे वासू म्हणाला.

गोविंदा म्हणाला, 'असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी' हा मी म्हटला व नरसूअण्णांनी मला शाबासकी दिली.'

आई मला म्हणाली, 'श्याम? मला फसविलेस! खोटे बोललास ! श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस?'

वासू म्हणाला, 'श्याम


162 of 773