आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मीलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे, ही पूर्वजांची थोर दृष्टी होती.
त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री-पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून कित्ती दूर! परंतु आमच्या गावाहून बैलगाडया करून किती तरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा-माझ्या आईचे चुलते-त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या
तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, 'जा, देवाच्या पाया पड. नाही तर घरी येऊ देत, त्यांना सांगेन; मग मार बसेल; बोलणी खावी लागतील.' मी जागचा हललो नाही. मला वाटले, आई वडिलांस सांगणार नाही. ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, 'नाही ना ऐकत? बरं! मी आता बोलत नाही.'
वडील रात्रीसच परगावाहून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भूपाळया सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, 'श्याम! काल कोणता श्लोक म्हटलास?'
आई