त्याचे ते आगीसारखे, तार्यां सारखे डोळे!... हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाडयांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.

लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, 'आई! जाऊ दे ना मला! मी वाटेत हट्ट करणार नाही. खोल पाण्यात जाणार नाही. तात्या (माझे चुलत आजोबा) सांगतील तसा वागेन. भाऊंना (वडिलांना) सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई! त्या पोथीत... स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघस्नान, कार्तिकस्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला?'

आई म्हणाली, 'श्याम! अरे, आजच्याने काय झाले? तू पुढे मोठा हो व जा गंगा-गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले, तरी पाच-सहा


166 of 468

उभा रहा. श्लोक म्हटलास का काल?'

वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, 'नाही म्हटला.' 'मग खोटं का सांगितलेस? शंभरदा तुला सांगितले आहे की, खोटे बोलू नये म्हणून.' वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, 'आता नाही पुन्हा खोटे बोलणार.'

'आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते? माजलास होय तू?' वडील आता उठून मारणार, असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व


166 of 773