मी म्हटले, 'आई! मी दमून जाईन. सहा कोस चालेन. परंतु पुढे? आणि गाडया पुढे निघून जातील. मला सोबत? मला भीती वाटेल आणि गाडयांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे, हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस-पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे?'

'आई म्हणाली, 'ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला, त्याला कोणाची आली आहे भीती? साप-वाघ त्याला मार्ग दाखवितील. खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला, तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली, तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली, तर गाय-माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला, त्याला सारे मित्र, सारे सखे. त्याचे


168 of 468

'ये इकडे,'असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, 'जा आता, शाळा आहे ना?'

मी म्हटले, 'आज रविवार, आज सुट्टी आहे.'

वडील म्हणाले, 'मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू.' मी होय म्हटले.

वडिलांचा स्वभाव मोठा हुषार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत


168 of 773