आई म्हणाली, 'अरे इतकी घाई का? मी पानगी करत्ये, ती खा व मग जा शाळेत. बन्या, बापू कोठे अजून गेले आहेत.? बस जरा.'

मी रागाने म्हटले, 'मला नको जा पानगीबिनगी. खायला देतेस; पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपला शाळेत जाऊन बसतो.'

आई जरा रागाने म्हणाली, 'पुन्हा माग तर खरे खायला. बघ देईन का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकार्या च्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देत्ये, ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, ते तरी बघत्ये. श्याम, मागे फीर, आईचे ऐकावे हो सांगितलेले.'

परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला


170 of 468

तरू सेवुनि उष्ण शीत ।

जगी असे हीच विकास-रीत ॥


रात्र नववी: मोरी गाय


"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसर्यालची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला.


"तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे.' शिवा म्हणाला.

श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, 'बारकू!


170 of 773