व 'देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो.' अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो. तेव्हा एकसुध्दा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा, अद्याप उघडलीही नव्हती.

माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाटयाने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्ठयावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाडया किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाडया दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?


171 of 468

तू मला आवडतोस, म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोर्याा गाईची गोष्ट सांगणार आहे.'


श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहात होती. श्यामने सुरूवात केली:

"आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळयासमोर आहे. अशी गाय आपल्या सार्याच गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा पाच


171 of 773