मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळयांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, 'गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस.' पोट म्हणे 'घरी जा' घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणार्यारसमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.


172 of 468

शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे.'

माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठयात जावयाची. मोर्याट गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंडदेखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुसर्याहची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत.


172 of 773