परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! 'अरे आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळयाला फास लावायचास एखाद्या वेळी!' असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले; तेव्हा कळले की मी हरवलो.

आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती, म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल


173 of 468

तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसर्यापच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसर्याभची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.

माझी आई मधून गोठयात जावयाची. तांदूळ


173 of 773