कदाचित, म्हणून गेलो असेन, असं हेडमास्तरांस वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठयांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीनेसुध्दा मुलांच्या उपडया हातावर, बोटांच्या पेर्यांनवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी, म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो, म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला. अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले, तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले, की माराला भिऊन श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खर्डे घासायला व कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. 'मास्तरांनी


174 of 468

धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोर्याे गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई


174 of 773