उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमीजास्त झाले. तर; न व्हावे ते झाले. तर!' असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले.

हेडमास्तर म्हणाले, 'आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी, म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे, भाऊराव!'

परंतु वडील म्हणाले, 'पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!'

घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणिले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात, तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. 'जा रे आपापल्या घरी. का तमाशा आहे?' वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली.


175 of 468

खाजवी, तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोर्याआ गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसर्याआ कोणाला काढू देत नसे.

ज्याने द्यावे त्याने घ्यावे, असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. 'गंधेन गाव: पश्यन्ति.' गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम


175 of 773