वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरूणावर पडलो.

थोडया वेळाने वडील आले व म्हणाले, 'श्याम! ऊठ बाळ. पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुध्दा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छडया मारीत. माराला भिऊन कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही, तो कसला मास्तर? ऊठ. हातपाय धू. तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी.'

मी उठलो. हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले! मारण्याचे आता कमी करतील, असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच, तर बेताने मारतील, असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला,


176 of 468

न करणार्यासला ती लाथ मारी. 'पाप्या! माझ्या कासेला तू हात लावू नकोस; माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, 'असे जणू ती सांगत असे.

ती मोरी गाय भाग्यवान होती, असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात.


176 of 773