असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील, असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठयांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य, अगदी पूर्ण जरी नाही, तरी वसाहतीचे तरी मिळाले ! आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही!

मी का पळून गेलो होतो, हे तीन जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. तिन्हीसांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरूणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, 'श्याम!' मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, 'श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते? मी सांगितले, तरी ऐकले नाहीस!' असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले


177 of 468

एक दोन दिवसांत ढोर मरते.

मोर्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले; परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले; परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु:ख कळते! इतरांस काय समज? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात


177 of 773