वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये, माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास, हे फार वाईट केलेस, असे मनात येऊनसुध्दा वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास? परवा गावातला कुणाचासा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला, असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम! एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- 'चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस.' देवासाठी पळून गेलास तर जा. सार्याव संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!'


179 of 468

दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणार्या ला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'


रात्र दहावी: पर्णकुटी


"मला पण ने रे भाऊ


179 of 773