आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला.

श्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.'

नारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !'

श्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.'

श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक


18 of 468

असते. त्याच्या बर्याववाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दर्यातखोर्यांंत असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोपर्याोत असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व


18 of 773