रात्र सतरावी: स्वावलंबनाची शिकवण
"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं,.. अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. 'अनन्तं वासुकिं' हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रानाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे.'
आमच्या शेजारी गोविंदभटजी परांजपे राहात होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज एक-दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ
गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.
'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.
'ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सार्यांहनी ऐकावे. मी सुध्दा आले असते; पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर.' भाऊची आई म्हणाली.
'शेजारची भिमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ?' वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती.
'चल, तेथे