झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की, आपणांस राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वत:बरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दु:खी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे. आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.
एके दिवशी भास्कर मला म्हणाला, 'श्याम! आता दहाच श्लोक माझे राहिले. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?'
मी एकदम
मग 'मला झोप येते, चल घरी' अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र!' असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले.
आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत.
वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती.
'शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे. ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा