असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, 'भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन.'
भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, 'भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम! शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू. नीट जपून वापर. दे रे त्याला.' भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, 'आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील.'
घरात राहून तिने मोर्याब गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, ज्या घरात एके काळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले; त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाटयाने जात होतो! कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्या वेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही