भीमाताई भास्करवर रागावल्या, 'तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस? दे त्याला, नाही तर बघ.' भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.
मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा, म्हणून गुरांच्या मोठयात जाऊन बसलो! गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही, सारे सामान सिध्द होते. रामरक्षा लिहावयास सुरूवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले, त्या वेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या किती तरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या, पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी
दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता; परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात.
नवीन घरी आता सवय झाली; परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई. कारण स्वत:ची परिस्थिती ती ओळखून होती.
आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई.