हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पध्दत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील किती तरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वत: लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले, असे दिसतं नाही. परंतु ते जाऊ दे.

मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले.


186 of 468

तिला अपमान वाटे. नवर्याडसह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते. आई ओटीवर गेली व म्हणाली 'माझ्याच्याने येथे अत:पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते.'

वडील म्हणाले, 'अगं, आपण आपलेच भात खातो ना? फक्त येथे राहातो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला


186 of 773