संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेर्याम घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.
त्यांनी विचारिले, 'काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?
मी एकदम म्हटले, 'हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?
ते एकदम म्हणाले, 'तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?'
मी सांगितले, 'भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली.'
'बघू दे तुझी रामरक्षेची वही,' ते कौतुकाने म्हणाले.
मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षर किरटे होते.
वडील म्हणाले, 'शाबास अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता.'
मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरुन हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल?
नाही.'
'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले.
'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर